Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Ahamadnagar › ...अन मराठा समाज एकवटला!

...अन मराठा समाज एकवटला!

Published On: Dec 01 2017 8:31AM | Last Updated: Dec 01 2017 8:31AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी शाळकरी मुलीवर अत्याचार करुन, तिची निर्घून हत्या करण्यात आली.या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि तीन नराधमांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी राज्यभरातील मराठा समाज एकवटला गेला. हत्येच्या निषेधार्थ  राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे काढले गेले. याचा प्रारंभ औरंगाबाद जिल्ह्यातून झाला. राज्यभरात जवळपास 58 मूकमोर्चे काढण्यात आले होते. 

नववीत शिक्षण घेणारी पीडित मुलगी सायंकाळी पाच वाजता मसाला आणण्यासाठी आजोबांच्या घरी गेली होती. मसाला घेऊन परतत असताना नराधमांनी तिच्यावर अत्याचार करुन, निर्घून हत्या केली. ही घटना जिल्हाभरात वार्‍यासारखी पसरली. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होऊ लागला.पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा आणि नराधमांना कडक शिक्षा मिळावी,यासाठी राज्यभरातील मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्र आल्या. आपापसातील सर्व मतभेद दूर करत, मोर्चेबांधणी केली गेली. त्यातून मराठा क्रांती मूकमोर्चाची संकल्पा आखली गेली. औरंगाबाद जिल्ह्यात पहिला मराठा क्रांती मूकमोर्चा दि.9 ऑगस्ट 2016 रोजी काढण्यात आला. या मोर्चात मराठा समाज मोठया संख्येने सहभागी झाला. या मोर्चाला प्रतिसाद मिळाल्याने, जिल्हानिहाय मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्णय घेतला गेला. दि.23 ऑगस्ट 2016 रोजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला होता. या भव्य मोर्चाचे नेतृत्व मराठी तरुणींनी केले होते.असेच मूकमोर्चे सर्वच जिल्ह्यात निघाले होते. शांततेत आणि शिस्तबध्द निघालेल्या या मोर्चाची सर्वत्र दखल घेतली गेली.राज्यभरात असे 54 मोर्चे काढण्यात आले होते.  

पीडित शाळकरी मुलीच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा द्या, जलदगती न्यायालय स्थापन करुन खटला चालवावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा आदी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले गेले.

मराठा क्रांती मूकमोर्चाच्या माध्यमातून राज्यभरातील मराठा समाज एकवटला गेला. या मोर्चाने राज्य शासनाला देखील धडकी भरली गेली होती. त्यातून कोपर्डी येथील पीडित शाळकरी मुलीला न्याय मिळून, तीन नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे.या निकालाचे सर्वत्र स्वागत होत आहे.