Fri, Jul 19, 2019 05:11होमपेज › Ahamadnagar › ‘मंदिर बचाव’ला वाढता पाठिंबा

‘मंदिर बचाव’ला वाढता पाठिंबा

Published On: Dec 02 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 12:56AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शहरातील मंदिरे पाडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्यानंतर मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने झाली. या आंदोलनामुळे ही मोहीम थांबली आहे. वाचलेल्या मंदिरांच्या परिसरात जावून जनजागृती सभा घेतल्या जात असून, त्यास पाठिंबा वाढत आहे, असे प्रतिपादन संभाजी भिडे गुरुजी प्रणित श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे यांनी केले.

मंदिर बचाव कृती समितीच्यावतीने केडगांव, शाहूनगर येथे  साई मंदिरात जनजागृती सभा घेण्यात आली. यावेळी बापू ठाणगे बोलत होते. यावेळी समितीचे निमंत्रक वसंत लोढा, सदाभाऊ शिंदे, बाळासाहेब भुजबळ, सुहास मुळे, कैलास दळवी, शिवाजी लोंढे, डॉ.मुकुंद शेवगांवकर, अजितसिंग दडियाला, सुनील कुलकर्णी, बबन खामकर, सुरेखा सांगळे, जयाप्रदा खाकाळ, राजकुमार जोशी, मिलिंद भालसिंग आदी उपस्थित होते.

यावेळी वसंत लोढा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध नसून, मनपाच्या चुकीच्या सर्व्हेक्षणाला विरोध आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिकस्थळे पाडण्यास आमचा विरोध नाही, मात्र जी धार्मिक स्थळे रस्त्यापासून बाजूला आहेत, अशा धार्मिकस्थळांना समिती हात लावू देणार नाही.