Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Ahamadnagar › सण पत्नीचा...संक्रांत पतीराजावर! 

सण पत्नीचा...संक्रांत पतीराजावर! 

Published On: Jan 13 2018 11:21AM | Last Updated: Jan 13 2018 11:21AM

बुकमार्क करा
ढोरजळगाव : वार्ताहर

आयुष्यभर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आणि सर्वांचे हट्ट पुरवता पुरवता अगोदरच नाकी नऊ आलेल्या पतीराजांवर पुन्हा एकदा याही वर्षी सालाबादप्रमाणे खर्चाची संक्रांत आली आहे.

तीन हट्टांपुढे कायमच हतबल असलेल्या घरातील कर्त्या पुरुषांना संपूर्ण आयुष्य इतरांचे हट्ट पुरवण्यातच आपले आयुष्य कंठावे लागते. बाल हट्ट, स्री हट्ट आणि राज हट्ट सर्वांना माहित आहेतच.

मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. तसा हा सण फक्त स्रीयांचाच. पण तत्पूर्वीच या सणाची जोरदार तयारी स्रियांना करावी लागते. मात्र त्यामध्ये पतीराजांचा सहभाग असल्याशिवाय कसे चालेल? कारण पती आणि पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत आणि दोनही चाकाशिवाय संसाराची गाडी पुढे कशी जाणार? या सणासाठी लागणारी (भली थोरली) साधनसामग्री अगदी पंधरा दिवसांपासून अगोदरच गोळा करावी लागते. मग त्यामध्ये अगदी साडीपासून तर थेट दागदागिन्यांपर्यंत. वेगवेगळ्या रंगसंगती, नमुने, किंमती, दर्जासह सर्व बाबींचा अगदी बारीकसारीक विचार करूनच खरेदी केली जाते आणि पतिराजांच्या खिशाला कात्री लागते. ही कात्री इतकी धारदार असते की कधी खिसा रिकामा झाला हेही कळून येत नाही. कापड दुकान, सोनाराचे दुकान, बांगड्यांचे दुकान, ब्युटी पार्लरसह किरकोळ साहित्यात कधी भरमसाठ खर्च होतो.