Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Ahamadnagar › नगर : जामखेड येथे ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार

नगर : जामखेड येथे ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार

Published On: Jun 01 2018 9:46AM | Last Updated: Jun 01 2018 9:46AMजामखेड : प्रतिनधी

जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि लग्झरी बसच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणार्‍या लग्झरी बसची आणि ट्रकची धडक झाली यात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. यात दहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. या अपघातात जखमींची स्थिती गंभीर असून मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता असल्याचे समजते.