Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Ahamadnagar › एकतर्फी प्रेमातून पेटवून युवतीची हत्या

एकतर्फी प्रेमातून पेटवून युवतीची हत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी 

एकतर्फी प्रेमातून युवतीस तिच्या राहात्या घरासमोर पेटवून देऊन, निर्घृणपणे खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. तालुक्यातील कोरेगाव येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

अश्‍विनी किसन कांबळे (20) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर शैलेश बारकू अडसूळ व किशोर छगन अडसूळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील कोरेगांव येथील  शैलेश अडसूळ याचे अश्‍विनी कांबळे या युवतीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, ती त्याला फारसा प्रतिसाद देत नव्हती. एक वर्षापूर्वी अश्‍विनीच्या आईने शैलेश हा आपल्या मुलीस फोन करून किंवा रस्त्याने जात असताना त्रास देतो अशी तक्रार दिली होती. 
या तक्रारीनंतर शैलेश याने काही दिवस त्रास दिला नाही. मात्र, त्याच्या डोक्यातून आश्‍विनी गेली नाही. अश्‍विनी 25 मार्च रोजी दुपारी तिच्या घरासमोर उभी होती. घरामध्ये कोणीही नव्हते. हे पाहून शैलेश व किशोर  हे दोघे तिथे आले. त्यांनी अश्‍विनी हिस पेटवून देऊन तेथून पळून गेले. त्यानंतर अश्‍विनीला नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, गंभीररित्या भाजल्याने काल (दि.28) तिचे निधन झाले. शवच्छिेदनानंतर तिचा मृतदेह कोरेगाव येथे काल सकाळी आणण्यात आला. मात्र, आरोपींना अटक होईपर्यंत अश्‍विनी हिच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. 


  •