Wed, Nov 21, 2018 09:40



होमपेज › Ahamadnagar › नगर : चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण : आरोपी बर्डेला मरेपर्यंत जन्‍मठेप

नगर : चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण : आरोपी बर्डेला मरेपर्यंत जन्‍मठेप

Published On: Aug 07 2018 2:10PM | Last Updated: Aug 07 2018 2:46PM



नगर : प्रतिनिधी

पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. ७) नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 

डिसेंबर २०१६ मध्ये  रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला होता.  या घटनेमुळे शरीराला आतून गंभीर इजा झाल्याने तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसतानाही कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर बर्डे यास संशयित म्हणून अटक केली होती. बर्डेविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.  

खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले. न्यायालयाने  शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. या प्रकरणात 'पुढारी'ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता.