Fri, Aug 23, 2019 21:59होमपेज › Ahamadnagar › सरकारी नोकरी सोडून केले सव्वाशे गायींचे संगोपन

सरकारी नोकरी सोडून केले सव्वाशे गायींचे संगोपन

Published On: Dec 24 2017 12:22PM | Last Updated: Dec 24 2017 12:22PM

बुकमार्क करा

परभणी : बालासाहेब काळे

आजच्या काळात  जीवलगांना सांभाळणे जिथे कठीण बनले आहे तिथे मुक्या जनावरांचे काय? मात्र परभणीतील डॉ. राजेश रेणुकादास चौधरी सरकारी नोकरी  सोडून तब्बल सव्वाशे गाईंचा सांभाळ करीत आहेत. विशेष म्हणजे ते कुणाचा एक रुपयाही घेत नाहीत. वर्षाकाठी लागणारा जवळपास 8 लाखांचा खर्च ते स्वतः करतात. सरकारी नोकरी सोडून केले सव्वाशे गायींचे संगोपन मानवत  तालुक्यातील वांगी (थार) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ.चौधरी हे आयुर्वेदात एम. डी. आहेत. ते कुष्ठरोग सहायक संचालक पदावर कार्यरत होते. 

2009 मध्ये गोरखपूर प्रकाशनचा गोसेवा  विशेषांक त्यांच्या वाचनात आला. त्यामुळे गाय आणि तिचे महत्त्व पटल्याने गोसेवेचा लळा लागला. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी गाईची सेवा सुरू  केली. वांगी शिवारात  30 एकरावर निरनिराळी पिके घेताना त्यांनीसेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यावेळी गोवंश हत्याबंदीचा कायदा नव्हता. परभणीत दर गुरुवारी भरणार्‍या खंडोबा बाजारातून   त्यांनी गायी विकत आणायला सुरुवात केली.  सुरुवातीला केवळ 2 गायी होत्या. त्यांनी तब्बल 25 गायी कसायांच्या तावडीतून सोडवून घेतल्या आहेत. आजूबाजूचे शेतकरी भाकड गायी आणून सोडतात.  त्यांना चारापाणी करण्यासह इतर व्यवस्थेसाठी त्यांनी शेतामध्ये मोठा गोठा बांधला असून 5 माणसेही देखरेखीसाठी ठेवली आहेत.

साधारणतः 100 गायी व वासरे वांगी येथे शेतात असून परभणीतील त्यांच्या घरीही काही गायी संगोपनासाठी आहेत. विशेष म्हणजे एका  खासगी महाविद्यालयात शिकविण्यासाठी मिळणारे मानधन  सेच 30 एकर शेतीतून मिळणारे उत्पन्नही ते गोसेवेलाच लावत आहेत. वाढदिवसालाही मुलांकडून गायींचीच मागणी नूमानस ग्रंथाचा मराठीत अनुवाद  डॉ. चौधरी यांनी मुलीस वाढदिवसाला मोबाइल घेण्याकरिता 8 हजार रुपये दिले होते. त्या दिवशी बाजारात पाहिलेली गाय विकत घेण्याचा विचार  असूनही पैसे नसल्याने ते घरी परत आले. त्यावेळी मुलीने आपल्याकडील पैसे देऊन ती गाय घरी  आणण्यास सांगितले. मुलगा स्वानंद यालाही आपल्या वाढदिवसाला कोणतेही गिफ्ट न घेता गाय विकत घ्यायला लावली. 

पत्नी लता आणि मुले-मुली त्यांना गोसेवेसाठी मदत करीत आहेत. डॉ. चौधरी यांचे वडील रे. स. चौधरी हे प्रसिद्ध साहित्यिक होते. डॉ. राजेश चौधरी यांनीदेखील 17 वर्षांपूर्वी झालेल्या बायपास सर्जरीवरील  अनुभव पुस्तक रूपाने मांडला आहे. गोसेवा नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. डॉ. चौधरी यांनी गोक्रांतीकारक गोपालमुनी महाराज लिखित धेनूमानस या 700 पानी हिंदी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे.