Tue, Mar 26, 2019 12:10होमपेज › Ahamadnagar › कुकडीचे आवर्तन सुटले : आमदार राहुल जगताप 

कुकडीचे आवर्तन सुटले : आमदार राहुल जगताप 

Published On: Jul 22 2018 8:31PM | Last Updated: Jul 22 2018 8:31PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

कुकडी प्रकल्पात पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन आज (दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास कुकडी कालव्याला पाचशे क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचा प्रश्न निर्माण झाला होता. कुकडी धरण लाभक्षेत्रामध्ये पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक सुरु आहे. धरणात होणारी पाण्याची आवक आणि आवर्तनाची मागणी लक्षात घेऊन आपण कुकडी कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. यासंदर्भात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. सगळ्या परिस्थितीचा विचार करून आजपासून आवर्तन सोडण्यात आले आहे. सुरुवातीला सीना आणि विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर छोट्या मोठ्या तलावात पाणी सोडून ते भरून घेतले जाणार आहेत. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.