नगर : प्रतिनिधी
तक्रारदाराला योग्य वागणूक न देता व त्याची तक्रार दाखल करून न घेणारा कोतवाली पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार सुनिल जगन्नाथ शिरसाठ यास निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी ही कारवाई केली.
पोलिस ठाण्यात तक्रारदाराला योग्य वागणूक न देणारे, गुन्ह्याचे स्वरूप कमी करणे, दखलपात्र गुन्ह्याचे स्वरूप कमी करून अदखपात्र गुन्हा म्हणून नोंद करणार्यांबाबत पोलिस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रेवण दहिफळे यास निलंबित करण्यात आले होते. आता कोतवालीत पोलिस नाईक शिरसाठ यास निलंबित करण्यात आले आहे. त्याने तक्रारदाराला योग्य वागणूक न देता पोलिस ठाण्यातून हाकलून दिले होते. विशेष म्हणजे सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला होता. त्यांच्या अहवालावरून पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.