Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Ahamadnagar › कोरठण खंडोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ

कोरठण खंडोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 10:53PM

बुकमार्क करा
कान्हूरपठार : वार्ताहर 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या  वार्षिक यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात काल (दि. 2) प्रारंभ झाला. सकाळी सात वाजता तहसीलदार भारती सागरे व पांडुरंग गायसमुद्रे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व सविता झावरे, सरपंच अशोक घुले व शालिनी घुले यांच्या हस्ते विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. 
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, जनार्दन मुंडे महाराज, विश्‍वस्त किसन धुमाळ, बन्सी ढोमे, किसन मुंडे, देविदास क्षीरसागर, हनुमंत सुपेकर, दिलीप घोडके, रामदास मुळे, जालिंदर खोसे, शांताराम खोसे, संभाजी मुंडे, दिलीप घुले, ज्ञानदेव घुले, वसंत ढोमे, बाबाजी जगताप, गणपत वाफारे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रदीप भाटे, कैलास घुले, बोर्‍हाडे यांच्यासह भाविक उपस्थित होते. महाआरतीनंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. महाआरती अगोदर पहाटे चार वाजता श्री खंडोबा देवास मंगलस्नान घालून पूजा झाल्यानंतर शृंगारमूर्ती दर्शनास प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजता ठका वाफारे, मिना वाफारे, विक्रम ढोमे, नंदा ढोमे, बन्सी ढोमे व लता ढोमे या दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली. 

आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे लाखभर भाविकांनी श्री खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेत विविध धार्मिक विधी पार पाडले. दुपारी चार वाजता श्री खंडोबाची पालखी मिरवणूक पिंपळगाव रोठा गावात मुक्कामी जाण्यासाठी वाजत गाजत निघाली. या पालखीची छबिना मिरवणूक रात्री गावात संपन्न झाली. नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी सांयकाळी पालखीचे पूजन केले.