Wed, Feb 20, 2019 03:32होमपेज › Ahamadnagar ›   शिर्डीत तरुणावर केला चाकूने हल्ला

  शिर्डीत तरुणावर केला चाकूने हल्ला

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:20AMशिर्डी : प्रतिनिधी

जुन्या वादाच्या कारणावरून एका तरूणावर चाकू हल्ला घडल्याी घटना शहरातील कनकुरी रस्त्यावर घडली. चाकू हल्ला करणार्‍या तरूणास पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे साथीदार पसार असून जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

गणेश बनसोडे असे जखमीचे नाव आहे. अनिकेत सुनील शेजवळ, नितीन शेजवळ, गुड्डू शेजवळ, पप्या शेजवळ, व राजू अजीज सय्यद असे मारहाण करणार्‍या आरोपींचे नावे आहेत. यातील राजू सय्यद याला अटक करण्यात आली आहे. 

बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शिर्डीतील कनकुरी रस्त्यावरील हॉटेल पवनधामसमोर तक्रारदारचा मुलगा गणेश बनसोडे (रा. साकुरी) व विक्की सोनवणे उभे असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने गणेश बनसोडे याच्या पोटात एक धारदार शस्त्र भोकसले. यात त्यास मोठी जखम झाल्याने तातडीने साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. काल (गुरुवारी) त्यास नाशिक येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी छबन आनंदराव बनसोडे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.