होमपेज › Ahamadnagar › दुचाकीची कठड्याला धडक बसून युवक उजनीत बेपत्ता

दुचाकीची कठड्याला धडक बसून युवक उजनीत बेपत्ता

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 22 2017 9:24PM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

भिगवण (ता.इंदापूर) येथील उजनी पाणलोट क्षेत्रावरील  पुलावर दुचाकीचा (एमएच. 16 बीएस.6016) टायर फुटून अपघात झाला. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील 25 फूट खोल पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सायंकाळी सुमारे सहा तासांपर्यंत युवक बेपत्ता होता. पोलिस, ग्रामस्थांकडून पाणबुडीच्या साह्याने शोधकार्य सुरूच होते. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले.

या घटनेत नितीन बबन भिसे (वय 28, रा.मलठण ता. कर्जत, जि. नगर) असे बेपत्ता विवाहित तरुणाचे नाव आहे. तो मलठण येथून सातारा जिल्ह्यातील भूईज साखर कारखान्याकडे जात असताना ही घटना  घडली. घटनेचे वृत्त समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून शोधकार्य सुरू केले होते रोडवरुन जात असणार्‍या बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड, पोलिस उपनिरिक्षक बी. एन पवार,हवालदार सतीश ढवळे, नाना वीर , रतिलाल चौधर, बापू हाडगळे, श्रीरंग शिंदे, रमेश भोसले, तात्या ढवळे नितिन काळंगे आदिनी शोधकार्यासाठी प्रयत्न केले.