Thu, Sep 20, 2018 14:54होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

Published On: Jul 06 2018 5:56PM | Last Updated: Jul 06 2018 6:07PMनगर  : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात आठ  आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. 

दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींमध्ये भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर रमेश मोकळे यांचा समावेश आहे. 

यांच्याविरोधात भादवि 302, 303, 120 ब, 143, 144, 145, 147, 148, 149, 504, 534 आर्म एक्ट 325, 425 असे कलम लावण्यात आले आहेत. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

आमादार संग्राम जगताप यांच्या नावाचा दोषारोपपत्रात समावेश नसला तरी 173 (8) नुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.