Thu, Nov 15, 2018 03:27होमपेज › Ahamadnagar › जवळ्यात एसटी बसवर केली दगडफेक

जवळ्यात एसटी बसवर केली दगडफेक

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 9:57PM

बुकमार्क करा
जवळाः वार्ताहर  

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील शौर्यस्तंभास मानवंदना  देण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी जनतेच्या अनुयायावर समाज कंटकाकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचे पडसाद जामखेड तालुक्यातील जवळा येथे उमटले.  

 बंद दरम्यान जवळा येथे जामखेड- करमाळा एसटी बसवर ( एमएच- 12  इएफ  6454) या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच क्रांती ज्योती दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. तसेच दूध ओतून देण्यात आले. त्यामुळे गावात काही वेळ तणावपूर्ण शांतता होती. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        

 जवळा (ता.जामखेड) येथे महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत जामखेड तालुक्यातील जवळा येथे बंदला गालबोट लागले. सकाळपासूनच आंदोलक आक्रमक भूमिका घेऊन गावातून बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जामखेड-करमाळा बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. दगडफेकीदरम्यान बसमध्ये  प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. चालकाला आंदोलकांनी भिरकावलेल्या दगडाचा हाताला मार लागला.

 जवळा येथील बंदला हिंसक वळण मिळाले. त्यामुळे गावात काही वेळ तणावपूर्ण शांतता होती. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास सकाळी अकरा वाजता सुट्टी देण्यात आली आहे. तसेच क्रांती  ज्योती विद्यालय व इंग्लिश शाळेलाही सुट्टी देण्यात आली आहे . जवळा येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिस हवालदार विठ्ठल चव्हाण व पोलिस कॉन्स्टेबल गहिनीनाथ यादव, तागड आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.