Fri, Mar 22, 2019 06:18
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

Published On: Jan 06 2018 1:17AM | Last Updated: Jan 05 2018 10:57PM

बुकमार्क करा
जामखेड/नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जामखेड व नगर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जामखेड येथील घटनेत अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

जामखेड तालुक्यातील घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरूवारी (दि 4) दुपारी साडेतीनच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगी (वय 15) ही आपल्या घरात एकटीच होती. त्यावेळी शेजारीच राहणारा साहील कमरूद्दीन शेख (वय 22) हा घराच्या मागील दाराने घरात आला.दरवाजा बंद करून त्याने धमकावत मुलीसोबत अश्‍लिल चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच बेडरूममध्ये ओढत नेऊन बळजबरीने अत्याचार केला. 

या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आरोपी साहील शेख याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (पोक्सो) व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करीत आहेत. 

दुसरी घटना नगर तालुक्यात घडली. 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 27 वर्षांच्या युवकाने शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घराशेजारीच राहत होता. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हे करीत आहेत.