Fri, Feb 28, 2020 17:24होमपेज › Ahamadnagar › पुण्यातील दाम्पत्यास लुटले

पुण्यातील दाम्पत्यास लुटले

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:45PM

बुकमार्क करा

जामखेड ः प्रतिनिधी 

 पुणे येथून मेहुणीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या नायगाव येथील कुटुंबीयांची कार खर्डा रोडवरील दरवाडी या ठिकाणी सहा दरोडेखोरांनी अडविली. महिलांच्या अंगावरील दागिने ओरबडून पावणेदोन लाख रुपयांंचा ऐवज चोरुन नेला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गाडीचा वेग कमी झाल्याने ही घटना घडली. 

ज्ञानेश्‍वर रामेश्‍वर गिरीगोसावी हे आपली पत्नी सुप्रिया, मुलगा वेदांत,( मूळ.रा. नायगाव. ता. जामखेड, हल्ली.रा. खेड शिवापूर, पुणे) बहिण तेजश्री कैलास गिरी व मेहुणे कैलास गिरी(रा.त्रिंत्रज. ता.भूम. जि. उस्मानाबाद) हे चौघे जण पुणे येथून आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथे शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता(एमएच.12 सीके. 3624) या कारने चालले होते. 

10 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सदरची कार जामखेड मार्गे खर्ड्याकडे जात असताना जामखेड-खर्डा रोडवरील दरवाडी गावाजवळ रस्ता खराब असल्याने चालकाने गाडीचा वेग कमी केला. या वेळी अचानक याच संधींचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी वाहक साईड च्या पाठीमागील गाडीचा दरवाज्याच्या उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकास आवाज आल्याने गाडी थांबवली. या वेळी गाडीच्या मागील बाजूस दोन महिला बसल्या होत्या.यातीलटोपी घातलेल्या एका दरोडेखोराने गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला कैलास गिरी यांना तू जाग्यावरून उठायचे नाही असा दम दिला. दोघा जणांनी मागील बाजूचा दरवाजा उघडून बहीण तेजश्री व पत्नी सुप्रिया यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण, नेकलेस, सोन्याची चैन, दोन डोरले, चैन, बोरमाळ असा एकूण 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला.

यावेळा पाठीमागून एक वाहन आल्याने सदरचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला.घटना घडली यावेळी सहा दरोडेखोर होते. यातील एकाने महिलेस रिव्हॉल्व्हर दाखवून मारहाण केली आहे. मात्र, पोलिसांनी फक्त चार दरोडेखोर दाखवून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर आरोपी विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादीच्या वतीने करण्यात आली होती,मात्र पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला नाही. 

 या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी लवकरच नायगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नायगाव येथील ग्रामस्थांनी दिली आहे. दुसर्‍या दिवशी दुपारी आरोपींच्या शोधासाठी नगर येथील श्‍वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.