Fri, Mar 22, 2019 05:47
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नगर बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडे

नगर बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडे

Published On: Mar 22 2018 5:44PM | Last Updated: Mar 22 2018 7:21PMनगर : प्रतिनिधी

शहरातील माळीवाडा परिसरात कुरियर पार्सलमध्ये झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाला आज सायंकाळी तसे आदेश प्राप्त झाले. माळीवाड्यातील स्फोटामागे दहशतवादी कारवाईचा संशय असल्याने मंगळवारी रात्रीपासूनच दहशतवादविरोधी पथक या घटनेवर लक्ष ठेवून होते. गुन्ह्याची पद्धत व टार्गेटवरील व्यक्ती यावरून काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या एखाद्या  दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता गृहीत धरून गृह खात्याने या गुन्ह्याचा तपास 'एटीएस'च्या नाशिक युनिटकडे वर्ग केला आहे. 

वाचा : कोण आहेत संजय नहार?

नाशिक युनिटचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून काम पाहतील. एटीएसचे पोलिस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक बुधवार सकाळपासूनच नगरमध्ये ठाण मांडून आहे. गुरुवारी दुपारी त्यांची शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. दोन दिवसांपासून नगर जिल्हा पोलिसांची काही विशेष पथके या गुन्ह्याच्या तपासात व्यस्त होती. या प्रकारातील आरोपींबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे तपासणीच्या यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत.

वाचा : नगरमध्ये क्रूड बॉम्बचा स्फोट

वाचा : पार्सल पडले आणि बॉम्ब अहमदनगरमध्येच फुटला

 

Tags : Anti terrorist squad, Nagar news, Nagar bomb blast, sanjay nahar, sarhad, sarhad Pune