Mon, Aug 19, 2019 07:42होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

‘त्या’ जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Published On: Sep 01 2018 1:44AM | Last Updated: Aug 31 2018 10:40PMनगर : प्रतिनिधी

भिंगारकडून बुर्‍हाणनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या 40 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत  कॅम्प पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

वर्षा उमेश साठे (वय 40, रा.निंबळक) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुर्‍हाणनगर रोडवरील एका धार्मिक स्थळाजवळ गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, बुर्‍हाणनगर रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाजवळ अपघात झाल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानुसार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका40 वर्षीय जखमी महिलेला बागडे नावाच्या इसमाने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांना समजले. उपचारा दरम्यान या जखमी महिलेचा मृत्यू झाला.

ज्या ठिकाणी महिला जखमी अवस्थेत आढळली त्या जागेपासून थोड्या अंतरावर शेतजमिनीत रक्त पडल्याचे आढळून आले. यावरून वर्षा साठे हिच्या मृत्यू मागे काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय मृत महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी कसून पाहणी केली. याप्रकरणी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरु आहे.