Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : चिमुरडीच्या मृत्‍यूमुळे रुग्णालयाची तोडफोड

अहमदनगर : चिमुरडीच्या मृत्‍यूमुळे रुग्णालयाची तोडफोड

Published On: Apr 29 2018 8:29PM | Last Updated: Apr 29 2018 8:28PMपंचवटी : देवानंद बैरागी

पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे राहणारी अडीच तीन वर्षाची चिमुरडी उकळत्या पाकात पडल्याने भाजली होती. तिला जुना आडगाव नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वेळीच उपचारासाठी दाखल करूनही डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संतप्त नातेवाईकांनी या हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटल प्रशासनाने मुलगी ८५ टक्के भाजल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अयोध्यानगरी दोन येथील शिवकृपानगर हिरावाडी येथे केटरिंगचा व्यवसाय करणारे पप्पू शिरोडे हे रविवार दि २९ रोजी सकाळी आठ वाजता गुलाबजाम बनविण्यासाठी साखरेचा पाक तयार करीत होते. यावेळी त्यांची ३ वर्षांची मुलगी बाजूला खेळत असताना गरम साखरेच्या पाकात पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. पप्पू शिरोडे यांनी स्‍वराला जुना आडगाव नाका येथील सद्‌गुरु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना उपचारासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले ते भरले तसेच काही औषध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्याने ती औषधें देखील शिरोडे यांनी उपलब्ध करून दिले. मात्र डॉक्टराने स्वराकडे लक्ष दिले नाही. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिला तपासण्यासाठी डॉक्टर दुपारी साडेतीन चार वाजता आले, आणि मुलीची तब्बेत फारच खालावली असल्याचे कारण देत काही वेळात तिला मृत घोषित केले.

सकाळपासून ऍडमिट करून देखील वेळीच उपचार न केल्याने स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत संध्याकाळच्या सुमारास सद्गुरू हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. यामध्ये काही मॉनिटर आणि काचांचे देखील नुकसान झाले आहे. यानंतर पोलिस तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले.