Fri, Oct 18, 2019 22:35होमपेज › Ahamadnagar › काष्टी येथील धन्वंतरी पतसंस्थेची ३० लाखाची रोकड पकडली 

काष्टी येथील धन्वंतरी पतसंस्थेची ३० लाखाची रोकड पकडली 

Last Updated: Oct 10 2019 10:19PM
श्रीगोंदा (नगर) : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काष्टी येथील धन्वंतरी सहकारी पतसंस्थेची ३० लाख रुपयांची रोकड दौंड येथील भरारी पथकाने नाकाबंदी करीत असताना पकडली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

धन्वंतरी पतसंस्थेचे काष्टी येथील युनियन बँक व दौॆड येथील ॲक्सिस बॅकेत खाते आहे. धन्वंतरी पतसंस्थेने साईकृपा कारखान्यातील शेतकऱ्यांचे ऊस बील देण्यासाठी ३९ लाख रूपये मागितले, पण युनियन बँकेत रोकड शिल्लक नसल्याने युनियन बँकेने ३९ लाख दौंड येथील बॅकेतील धन्वंतरी सहकारी बँकेच्या खात्यावर आरटीजीएस केले.

धन्वंतरी पतसंस्थेने ३९ लाखांपैकी ३० लाखांची रोकड गुरुवार (ता.१०) दुपारी काढली. ही रोकड चारचाकी वाहनातून काष्टीला आणत असताना दौंड येथील भरारी पथकाने पकडली.दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक म्हणाले, की धन्वंतरी पतसंस्थेने दौड येथील ॲक्सिस बॅकेतून काढले होते. भरारी पथकाने ही रोकड पकडली आहे.या संदर्भात निवडणुक समिती व आयकर विभागास कळविले आहे.

धन्वंतरी पतसंस्थेचे सचिव सुनील शेंडगे म्हणाले, की आमच्या पतसंस्थेकडून हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याची शेतकऱ्यांची ऊस बिल आदा केली जातात. हे बिल अदा करण्यासाठी ३० लाखाची रोकड दौड येथील पतसंस्थेच्या बॅक खात्यातून काढली आहे.