Sun, Jul 21, 2019 16:40
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून दोघांना कोठडी

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून दोघांना कोठडी

Published On: Sep 01 2018 1:44AM | Last Updated: Aug 31 2018 10:49PMकोपरगाव : प्रतिनिधी

अनैतिक संबंधाला अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी परिसरात सुरेगाव शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

अनिल बाबासाहेब घुसळे (वय 36 रा. सुरेगाव, तालुका कोपरगाव) असे मयताचे नाव आहे. आरोपींमध्ये बाळू दिलीप खंडवे (वय 26)  व विलास पुंजाराम कुवारे (वय 41, दोघे रा. सुरेगाव) या दोघांचा समावेश आहे. याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमा अनिल घुसळे व बाळू खंडवे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्या संबंधास मयत पती अनिल बाबासाहेब घुसळे हा अडचण करीत असल्याने रमाच्या सांगण्यावरून वरील आरोपींनी दि. 25 रोजी रात्री 9 वा. घरात बोलावून त्याचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह अर्जुन शेळके (रा. कोळपेवाडी) यांचे सुरेगाव शिवरातील शेतातील विहिरीच्या पाण्यात टाकून दिला. 

याबाबत विमल घुसळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिंसानी दोघांना शिताफीने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, कोपरगाव पुन्हा हादरले आहे.