Thu, Jul 18, 2019 20:50होमपेज › Ahamadnagar › कर्जतमध्ये महिलेचे मेंढरासह उपोषण

कर्जतमध्ये महिलेचे मेंढरासह उपोषण

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:36AMकर्जत : प्रतिनिधी

वहिवाट रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकावे, या मागणीसाठी सखुबाई धोंडीराम दोलताडे या महिलेने मेंढरासह तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सखुबाई धोंडीराम दोलताडे यांनी वहिवाट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदारांकडे वारंवार अर्ज केले होते. मात्र त्यांच्या अर्जाची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी  कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आमच्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाईकरण्याची गरज असताना कारवाई होत नाही. पंचनाम्यात अनेक त्रूटी आहेत. 
या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माजी सरंपच शिवाजीराव फाळके, ग्रामपंचायत सदस्य काका शेळके, शिवसेना नेते पप्पू फळके, सामाजिक कार्यकर्ते सतिश परदेशी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी शिवाजीराव फाळके म्हणाले की, सखुबाई दोलताडे यांना उपोषण करण्यास लागू नये, यासाठी मी कालच तहसीलदारांशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी प्रश्‍न सोडविण्याऐवजी माझा संबध नाही, असे उडवा-उडवीचे उत्तर त्यांनी दिले. जनतेला कोठेच न्याय मिळाला नाही तर शेवटी तहसीलदारांकडे यावे लागते. अंतिम जबाबदारीही तहसीलदारांचीच आहे.