Sat, Jan 19, 2019 22:09होमपेज › Ahamadnagar › नगर : घरगुती पाणीपट्टीत हजार रुपयांची वाढ? 

नगर : घरगुती पाणीपट्टीत हजार रुपयांची वाढ? 

Published On: Feb 06 2018 1:39PM | Last Updated: Feb 06 2018 1:39PMनगर : वृत्तसंस्था
शहर पाणी योजनेच्या उत्पन्न व खर्चातील तफावत भरून काढण्यासाठी घरगुती पाणी वापराच्या दरात १००० रुपयांची वाढ करण्याची स्थायी समितीने शिफारस केली आहे. नागरिकांमधून या वाढीव पाणीपट्टीला विरोध होण्याची शक्यता आहे. 

शहरात १५०० रुपयांची पाणीपट्टी आता २५०० पर्यंत पोहचली आहे. दरम्यान अनधिकृत नळ कनेक्शन शोधून कारवाई करण्याचे व महासभेकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश सभापती सुवर्णा जाधव यांनी दिले आहेत. महापालिका हद्दीबाहेरील कनेक्शन साठी ३००० हजारांच्या दरात २००० रुपयांची वाढ करण्यासही सभेने शिफारस केली आहे. सदरचे प्रस्ताव महासभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.