Tue, Mar 26, 2019 08:20होमपेज › Ahamadnagar › दराडे, झिरपेची मनपात नेऊन चौकशी

दराडे, झिरपेची मनपात नेऊन चौकशी

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 09 2018 11:46PM
नगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यात अटक केलेल्या प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप झिरपे या दोघांना काल (दि. 9) तोफखाना पोलिसांनी महापालिकेत नेऊन दोघांची कसून चौकशी केली. मुख्य व लेखाधिकार्‍यांच्या दालनात काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

दराडे व कॅफो झिरपे दोघे पोलिस कोठडीत आहेत. बनावट कामांच्या बिलांवर दोघांच्याही स्वाक्षर्‍या असल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी दीड वाजता तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे, कर्मचारी मंगेश खरमाळे, राम सोनवणे आदींसह पोलिसांचा फौजफाटा दराडे, झिरपे या दोघांना घेऊन महापालिकेत दाखल झाला. त्यांनी त्यांना कॅफोंच्या दालनात नेले. त्यानंतर दरवाजा आतून बंद करण्यात आला. तेथे दुपारी अर्धा तास चौकशी केली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिस दोघांनाही घेऊन निघून गेले. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी (दि. 10) दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.