होमपेज › Ahamadnagar › धनंजय तू बिनधास्‍त बॅटिंग कर रे : अजित पवार

धनंजय तू बिनधास्‍त बॅटिंग कर रे : अजित पवार

Published On: Feb 16 2018 7:28AM | Last Updated: Feb 16 2018 9:50AMराहुरी : प्रतिनिधी

आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे. क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजनसिंग बॅटिंगला आला आहे, आता त्याची  बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे असे म्हणताच, अरे धनंजय कधी-कधी हरभजनसिंग ही सामना जिंकून देतो. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर म्हणत अजितदादा पवार यांनी सर्वात शेवटी भाषण करण्याचे आदेशच दिले.

ही घटना आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेचा पहिला दिवस होता. श्रीगोंदा, शेवगाव येथील सभा झाल्यानंतर राहुरी येथील शेवटच्या सभेला राष्ट्रवादीचे नेते पोहोचले होते. सायंकाळी असलेल्या सभेला विलंब होऊ लागल्याने विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावरच आले आणि भाषणाला सुरुवात केली. तर युवकांच्या आग्रहाखातर धनंजय मुंडे मोटार सायकल  रॅलीसाठी स्वतः मोटार सायकलवर बसून स्थानिक युवकांनी आयोजित केलेल्या रॅलित सहभागी झाले. मोटारसायकल रॅली संपवून मुंडे सभास्थळी आली, तेव्हा अजितदादा पवार यांचे भाषण सुरु होते. दादा यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे असा आग्रह धरला. 

वाचा : मंत्रीच म्हणतात, 'जुमला गले की हड्डी' : धनंजय मुंडेंची जोरदार बॅटींग

प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्‍तीत बसत नाही, असा निर्वाळा मुंडे यांनी दिला. मात्र तरिही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी मुंडे यांना भाषण करण्याची परवानगी दिली. कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग आता कोण पाहणार? असा मिश्किल सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. यावर त्याच खेळकर वृत्तीने अजितदादांनीही मुंडे यांना उत्तर देत म्हटले की, कधी कधी हरभजन सिंगसुद्धा सामना जिंकून देतो. तू बिनधास्त भाषण कर अशा शब्दात धनंजय मुंडे यांना मॅच वीनर चा किताब दिला.

मुंडे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा, त्यांनी पहिल्यांदा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले. पक्षशिस्त पाळणारा मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला आज शेवटी बोलताना खूप अवघडल्यासारखे वाटते, दादा तुम्ही परवानगी दिली. हा तुमचा मोठे पणा आहे. तुम्ही आदेश दिला आहे आणि मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे म्हणून बोलतो असे सांगत आपल्या नेहमीच्या फॉर्मात सरकार विरुद्ध जोरदार बॅटिंग सभा जिंकली.

वाचा इतर बातम्या : 

सरकार किती ठिकाणी जाळ्या लावणार? : अजित पवार

युवतीने पुरुष बनून केला दोन महिलांशी विवाह

सोनम कपूरमुळे काँग्रेस ट्रोल