Thu, Sep 20, 2018 23:55होमपेज › Ahamadnagar › डॉन बॉस्को पुलाजवळ कसाबवर चाकू हल्ला

डॉन बॉस्को पुलाजवळ कसाबवर चाकू हल्ला

Published On: Dec 04 2017 4:00PM | Last Updated: Dec 04 2017 4:00PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी  

मागील भांडणातून डॉन बॉस्को पुलाजवळ 11-12 जणांच्या टोळक्याने अविनाश कसाब यांच्यावर चाकू हल्ला केला. गुरुवारी (दि. 30) घडलेल्या घटनेबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरुद्ध शुक्रवारी विरोधी गटानेही फिर्याद नोंदविलेली होती.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चिकू ऊर्फ संदेश लाजरस साळवे (रा. डॉन बॉस्को कॉलनी, नगर) अमृष आढाव, ठाणगे (पूर्ण नाव माहीत नाही), दाद्या ऊर्फ वैभव शिंदे, पवन भिंगारदिवे, अमोल जाधव व इतर 5 ते 6 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस नाईक गाजरे हे करीत आहेत. याबाबत अविनाश सनातन कसाब (रा. प्रेमदान कॉलनी, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणातून टोळक्याने कसाब यांना रस्त्यात अडविले. चाकू, लाकडी दांडके, पाईपने बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले.