Fri, Apr 26, 2019 09:35होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्री शिंदे यांनी दिली अधिकार्‍यांना तंबी!

पालकमंत्री शिंदे यांनी दिली अधिकार्‍यांना तंबी!

Published On: Dec 10 2017 1:17AM | Last Updated: Dec 09 2017 11:30PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यासाठी राज्य, केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळूनही अनेक विकास कामे अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे अशा अपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करून, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची तंबी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.ना. शिंदे  यांनी जिल्हयातील विविध विषयांचा, विविध विकास योजनेचा विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खा. दिलीप गांधी, आ. भाऊसाहेब कांबळे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, मनपा आयुक्त घनशाम मंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलिस अधीक्षक घनःशाम पाटील, अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनिल गायकवाड, तहसीलदार गणेश मरकड आदिसह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हयात 6 लाख 29 हजार 125 कुटूंबापैकी 5 लाख 79 हजार 902 कुटंबाकडे शौचालय आहे. शौचालयांच्या उर्वरित बांधकामांचा वेग वाढविण्याच्या सुचना ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. जिल्हयातील विद्युत रोहित्रस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेतकर्‍यांना सद्यस्थितीत वीजेची आवश्यकता आहे. तातडीने विद्युत रोहित्र उपलब्ध झाले पाहिजेत. असे सांगताना शिर्डी येथे साईसमाधी शताब्दीच्या कालावधीत हाती घेण्यात आलेल्या कामाचा आढावा राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना समन्वय समिती व विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

जिल्हयातील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, दुरुस्ती देखभाल व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठासंबंधी प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे अधिकार्‍यांना सांगण्यात आले. गृहनिर्माण अंतर्गत प्रलंबित कामे लक्ष घालून तातडीने पुर्ण करावेत असेही पालकमंत्री म्हणाले.