Sun, May 19, 2019 14:27
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ग्रा. पं. सदस्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

ग्रा. पं. सदस्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Mar 06 2018 11:03PM | Last Updated: Mar 06 2018 10:53PMनगर : प्रतिनिधी

नागरदेवळे ग्रामपंचायत मध्ये रस्त्यांची कामे न करताच पुर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बीले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सुमारे 15 लाखांच्या या  गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
तातडीने पोलिसांनी झोडगे यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.  झोडगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याशी सदर प्रश्नावर चर्चा केली असता, त्यांनी 19 मार्चपर्यंत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले.

नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते व गटारीची 15 लाखांची कामे पूर्ण केल्याचा दाखला 10 ऑगस्ट 2017 रोजी देण्यात आलेला आहे. या पुर्णत्वाच्या दाखल्यांमुळे संबंधित कामांची बिले काढण्यात आली. प्रत्यक्षात मात्र  कुठल्याही प्रकारचे कामे सदर ठिकाणी झालेले नाही. त्यामुळे या कामांची बोगस बिले काढून संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांच्या इतर साथीदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केला आहे. झोडगे यांनी केलेल्या तक्रारीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी या कामाची समक्ष पाहणी केली. नागरिकांचे जबाब घेतले, तरी पुढे काहीच कारवाई झाली नाही. 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी पत्र दिले होते. त्यास दोन महिने होत आले आहेत, तरीही कारवाईस टाळाटाळ होत असून, या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करुन संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी झोडगे यांनी केली होती.