Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Ahamadnagar › नगरः पुरावे द्या, कारवाई करू - केसरकर

नगरः पुरावे द्या, कारवाई करू - केसरकर

Published On: Apr 25 2018 12:10PM | Last Updated: Apr 25 2018 12:10PMनगर: प्रतिनिधी

केडगाव येथे पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुरावे द्या. पुरावे दिल्या त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करतो, असे सांगून  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांकडेच केडगाव दगडफेक व वाहनांची तोडफोड केल्याचे पुरावे मागितले. 

केसरकर यांनी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकार्यांकडून तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केडगाव येथील दगडफेक प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पुरावे मिळाल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता कारवाई करण्यात येईल. नगरची गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणा गंभीर स्वरुपाचे आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे.