होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीग्रस्तांना मिळणार 13 कोटी

बोंडअळीग्रस्तांना मिळणार 13 कोटी

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 10:10PMशेवगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दुसर्‍या टप्यातील बोंडअळी नुकसानग्रस्त 51 गावांतील 20 हजार 915 शेतकर्‍यांना 19 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे 12 कोटी 80 लाख रुपये अनुदानाचे धनादेश पुढील आठवड्यात बँकेत जमा करण्यात येणार आहेत.

गतवर्षी बोंडअळीने नुकसान झालेल्या कपाशी पिकासाठी शेतकर्‍यांना शासनाने हेक्टरी 6 हजार 800 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी सर्वांत जास्त 41 कोटी अनुदान प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात देण्यात आलेले 8 कोटी 75 लाख रुपये अनुदान 53 गावांतील 13 हजार 95 हेक्टरसाठी 16 हजार 352 शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात 13 कोटी 12 लाख रुपये मागील महिन्यात प्राप्त झाले आहेत.हे अनुदान वितरित करण्यासाठी उर्वरित गावांच्या शेतकरी याद्या तसेच पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेल्या अनुदानातून त्या गावातील काही शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्या याद्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यात 51 गावांतील 18 हजार 853.87 हेक्टर क्षेत्रासाठी 20 हजार 915 शेतकर्‍यांना 12 कोटी 55 हजार 767 रुपये अनुदान वाटप केले जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत धनादेश पूर्ण होऊन पुढील आठवड्यात ते बँकेत जमा करण्यात येणार आहेत.

दुसर्‍या टप्यात दहिगाव 2 शेतकरी 14 हजार 280 रुपये, ठाकूर पिंपळगाव 373 शेतकरी 23 लाख 24 हजार 924 रुपये,बक्तरपुर 5 शेतकरी 24 हजार 480 रुपये, खरडगाव 829 शेतकरी 56 लाख 8 हजार 220 रुपये, मुर्शतपुर 117 शेतकरी 6 लाख 12 हजार 440 रुपये, सालवडगाव  399 शेतकरी 25 लाख 16 हजार 340 रुपये, मुंगी 1 हजार 499 शेतकरी 85 लाख 39 हजार 328 रुपये, बोधेगाव 1 हजार 258 शेतकरी 85 लाख 18 हजार 332 रुपये, सुलतानपूर खु, 4 शेतकरी 40 हजार 120 रुपये, आखेगाव ति.226 शेतकरी 15 लाख 11 हजार 540 रुपये, अमरापूर 9 शेतकरी 41 हजार 140 रुपये, माळेगाव ने. 325 शेतकरी 19 लाख 92 हजार 428 रुपये, न. बाभुळगाव 494 शेतकरी 34 लाख 6 हजार 692 रुपये, ठा. निमगाव 629 शेतकरी 37 लाख 50 हजार 888 रुपये, बाडगव्हाण 372 शेतकरी 27 लाख 31 हजार 628 रुपये,शेकटे खु.272 शेतकरी 18 लाख 65 हजार 716 रुपये, बालमटाकळी 1 हजार 28 शेतकरी 76 लाख 13 हजार 626 रुपये मुरमी 112 शेतकरी  8 लाख 5 हजार 386 रुपये,सुकळी 364 शेतकरी 26 लाख 45 हजार 200 रुपये, दिवटे 174 शेतकरी 7 लाख 96 हजार 532 रुपये, लाडजळगाव 1 हजार 396 शेतकरी 70 लाख 2 हजार 688 रुपये, राक्षी 453 शेतकरी 26 लाख 37 हजार 667 रुपये, सोनेसांगवी 540 शेतकरी 34 लाख 84 हजार 628 रुपये, वरखेड 552 शेतकरी 31 लाख 78 हजार 432 रुपये, सोनविहीर 377 शेतकरी 22 लाख 23 हजार 900 रुपये, ढोरजळगाव ने. 463 शेतकरी 26 लाख 94 हजार 575 रुपये, रांजणी 572 शेतकरी 25 लाख 9 लाख 792 रुपये, कर्जत खु.87 शेतकरी 3 लाख 94 हजार 842 रुपये,मजलेशहर 2 शेतकरी 7 हजार 480 रुपये, कुरुडगाव 235 शेतकरी 13 लाख 81 हजार 516 रुपये, ढोरहिगंनी 21 शेतकरी 82 हजार 919 रुपये, पिंगेवाडी 191 शेतकरी 11 लाख 58 हजार 476, दहिफळ 449 शेतकरी 22 लाख 51 हजार 956 रुपये, आखतवाडे 496 शेतकरी 26 लाख 48 हजार 104 रुपये, आपेगाव 157 शेतकरी 7 लाख 70 हजार 924 रुपये, लखमापुरी 433 शेतकरी 24 लाख 68 हजार 688 रुपये, सुळेपिंपळगाव 166 शेतकरी 13 लाख 14 हजार 236 रुपये, वडुले खु.631 शेतकरी 28 लाख 80 हजार रुपये, वाघोली 667 शेतकरी 32 लाख 20 हजार 528 रुपये, आव्हाणे बु. 602 शेतकरी 30 लाख 73 हजार 600 रुपये, बर्‍हाणपुर 221 शेतकरी 10 लाख 40 हजार 400 रुपये, आव्हाणे खु.100 शेतकरी 4 लाख 39 हजार 960 रुपये, शहापुर 52 शेतकरी 2 लाख 27 हजार 800 रुपये, घोटण 181 शेतकरी 42 लाख 19 हजार 882 रुपये, विजयपुर 47 शेतकरी  1 लाख 50 हजार 960 रुपये,गदेवाडी 940 शेतकरी 52 लाख 7 हजार 788 रुपये, ढोरसडे 7 शेतकरी 24 हजार 480 रुपये, शहरटाकळी 12 शेतकरी 32 हजार 980 रुपये, अंत्रे 1 शेतकरी 1 हजार 20 रुपये, दहिगाव शे 485 शेतकरी 30 लाख 43 हजार 668 रुपये, शेवगाव 1 हजार 888 शेतकरी 1 कोटी 28 लाख 50 हजार 640 रुपये. असे अनुदान वाटप होणार आहे.आलेल्या दोन्ही टप्यातुन ज्या गावांना अनुदान वाटप झाले नाही, त्यांना तिसर्‍या टप्यात येणार्‍या रक्कमेतून वाटप केले जाणार आहे.