अहमदनगर : प्रतिनिधी
शनिशिंगणापूरचा कुख्यात गुंड गणेश भूतकर याची लोकांसमोर सिनेस्टाईल कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. बुधवारी (दि. 20) सायंकाळी भूतकर याच्या हाँटेलसमोर हा थरार घडला. मित्रानेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
भूतकर याच्या मृतदेहाजवळ दोन गावठी कट्टे आढळले आहेत. त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने एका पोलिस अधिकाऱ्यालाही मारहाण केली होती.
बुधवारी सायंकाळी भूतकर हा त्याच्या हाँटेलवर आला होता. त्यावेळी स्काँर्पिओतून त्याचा मित्र अविनाश बानकर व त्याचे काही साथीदार आले. त्यांनी भूतकर याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने भूतकरचा मृत्यू झाला.