Tue, Mar 26, 2019 12:04होमपेज › Ahamadnagar › माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना मातृशोक

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना मातृशोक

Published On: Jun 24 2018 11:48AM | Last Updated: Jun 24 2018 11:48AMराहुरी/नगर : प्रतिनिधी

गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणार्‍या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-103) यांचे रविवारी (दि.25) सकाळी निधन झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

कौसल्याबाई यांनी जिरायत जमीन असल्याने दुसर्‍यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण केले. बी. जी. कोळसे यांना न्यायमूर्ती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. अनाथ मुलांना शिक्षण मिळावे यासाठी गुहा येथे ‘गंगाधर बाबा’ छात्रायल सुरू केले. या अनाथ मुलांमध्येच त्या रहात. शेकडो अनाथ मुलांच्या त्या नानी बनल्या. कौसल्याबाई कोळसे यांच्यामागे एक मुलगा, सुमन घोगर व कमल देशमुख या मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

रविवारी दुपारी गुहा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, अरूण कडू पाटील, शिवाजीराव गाडे, पं.स. सभापती मनिषाताई ओव्हळ, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, डी. बी. जगताप, राहुरी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.