Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Ahamadnagar › स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह ५ जणांना अटक

स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह ५ जणांना अटक

Published On: Jul 16 2018 3:46PM | Last Updated: Jul 16 2018 3:45PMअहमदनगर : प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. नगरमध्ये दूध दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून यापूर्वी शेतकरी आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या शेतकरी संघटनेच्या ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच दक्षता म्हणून ३५० जणांना नोटीस बजावली आहे.

रविवारी रात्री उशिरा शिर्डी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक चारसमोर आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष इतर पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव  जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस बंदोबस्तात २० टँकर जिल्ह्याबाहेर मार्गस्थ करण्यात आले. जिल्ह्यातून दूध टँकरची वाहतूक होणाऱ्या १२ रस्त्यांवर पोलिसांची विशेष गस्त सुरू आहे.