Mon, Jul 22, 2019 00:46होमपेज › Ahamadnagar › सिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या खाक

सिलिंडरच्या स्फोटात पाच झोपड्या खाक

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 12 2018 11:53PMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय रस्त्यावर मजुरांच्या झोपडीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात शेजारील पाच झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी (दि.11) दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. सुदैवाने झोपड्यांतील दोघांना वेळीच बाहेर काढण्यात यश आल्याने जीवित हानी टळली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मळगंगानगर येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात मजुरांच्या पाच झोपड्या आहेत. रविवारी साडेचार वाजेच्या सुमारास एका झोपडीतील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात शेजारील पाच झोपड्या जळून खाक झाल्या. त्यात कामगारांचे संसारपयोगी साहित्यांसह इतर वस्तू जळून खाक झाल्या. यावेळी दोन सिलिंडरची आग वेळीच विझविण्यात आली. या झोपड्यांतील दोन जणांना बाहेर काढण्यात यश आल्याने जीवितहानी टळली. मात्र ही आग कशी लागली, याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

आग लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर व इतर साहित्याच्या मदतीने ही आग विझविली. आगीत झोपड्या जळाल्याने कामगारांना रडू कोसळले. या घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक राजेश भंडारी यांनी या कुटुंबांना किराणा मालासह इतर संसारपयोगी वस्तू व कपडे दिले. मात्र  या घटनेने या कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत.