Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांड प्रकरणी ५ जणांना अटक 

जामखेड हत्याकांड प्रकरणी ५ जणांना अटक 

Published On: May 01 2018 9:43AM | Last Updated: May 01 2018 9:43AMअहमदनगर : प्रतिनिधी

जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी कट रचून खून केल्याप्रकरणी दोघांना, तर आरोपींना मदत केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी  मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.

कैलास विलास माने (वय 46, रा. तपनेश्वर रोड, जामखेड), प्रकाश विलास माने (वय 44, रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केले आहे. तर, आरोपींना मदत केल्याप्रकरणी दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 50, रा तेलंगशी, ता जामखेड), सचिन गोरख जाधव (वय 34, रा. भांडेवाडी, कर्जत), बापू रामचंद्र काळे (वय 50, रा. नेर्ले, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे. 

दरम्‍यान, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलिस पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Tags : NCP, worker, shot, Ahmednagar,