होमपेज › Ahamadnagar › मटण बनविले नाही म्हणून पत्नीस पेटविले

मटण बनविले नाही म्हणून पत्नीस पेटविले

Published On: Dec 30 2017 12:54PM | Last Updated: Dec 30 2017 12:54PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

मटनाची भाजी केली नाही याचा  रागआल्याने स्वत:च्या पत्नीला रॉकेल टाकून जिवंत पेटवून देण्याचा खळबळजनक प्रकार टिळकनगर  नजिक पटेलवाडी (पारखे वस्ती) येथे  घडला.  याप्रकरणी भीररित्या भाजलेली  आशाबाई नाना पारखे (वय 40) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नवरा नाना चिलू पारखे याच्याविरूध्द गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे,

सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आरोपी नाना पारखे हा पत्नी आशाबाई पारखे हिला मटनाची भाजी का केली नाही, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तुला आता सोडणार नाही असे म्हणत तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आशाबाई पारखे या गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहे.