Sat, Sep 22, 2018 00:58होमपेज › Ahamadnagar › ऑलम्पिकमध्येही सुवर्ण पदक मिळविणार : रोइंग पट्टू दत्तू भोकनळ 

ऑलम्पिकमध्येही सुवर्ण पदक मिळविणार : रोइंग पट्टू दत्तू भोकनळ 

Published On: Aug 28 2018 9:13PM | Last Updated: Aug 28 2018 9:12PMसंगमनेर (जि. अहमदनगर) : प्रतिनिधी

जकार्ता येथे झालेल्या रोइंग स्पर्धेत मी सुवर्ण पदक पटकाविले आहे. परंतु, आगामी एशियन व ऑलम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी मेहनत करणार आणि ऑलम्पिकमध्येही सुवर्ण पदक मिळविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा आत्मविश्वास सुवर्णपदक विजेता रोइंग पट्टू दत्तू भोकनळ यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना  व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील मंगळापूरचा भूमिपुत्र असलेला आणि जकर्ता येथे झालेल्या रोइंगच्या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल दत्तू भोकनळ याचा मंगळापूरकरांच्या वतीने आयोजित केलेल्‍या  सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी तो बोलत होता. तो म्‍हणाला, ‘‘मी आता दीड महिन्याच्या सुट्टीवर आलो आहे, मला आता एशियन व ऑलम्पिक पर्यंत पोहचायचे आहे.