Thu, May 23, 2019 20:39
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › सासरच्या मंडळींनी जावयाला बेदम चोपले

सासरच्या मंडळींनी जावयाला बेदम चोपले

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 1:06AMनगर : प्रतिनिधी

पत्नी व मुलाला नांदण्यास घेऊन जाण्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळीनी चोपले. कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार बुर्‍हाणनगर येथे घडला. कैलास गोविंद फुलारी (वय 43, रा. आलमगीर, भिंगार) असे जखमी जावयाचे नाव आहे.

याप्रकरणी विशाल रमेश धाडगे, धनंजय धोंडीराम शेलार, भाऊ धोंडीराम शेलार (तिघेही रा. बुर्‍हाणनगर) रामदास जाधव (रा. काटवन खंडोबा, नगर) यांच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, कैलास फुलारी हे रिक्षा चालवतात. त्यांचे व त्यांच्या पत्नीचे भांडण झाले होते. न्यायालयाने कैलास फुलारी यांच्या बाजुने निकाल देत पत्नी व मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. त्यावर फुलारी सासरवाडीला बुर्‍हाणनगर येथे गेले. यावेळी वरील आरोपींनी काही एक बोलू न देता फुलारी यांना कुर्‍हाडीच्या दांड्याने डोक्यावर, हातावर, व पायावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली. यावेळी फुलारी यांचा मोबाईल गहाळ झाला. घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल आघाव हे करीत आहेत.