होमपेज › Ahamadnagar › निवडणुकीचा बिगूल वाजला                  

निवडणुकीचा बिगूल वाजला                  

Published On: Aug 24 2018 12:40AM | Last Updated: Aug 24 2018 12:08AMनगर : प्रतिनिधी

माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार बुरुडगाव, टाकळीमिया, घारगाव, घोडेगाव, पानसवाडी, करंजी, टाकळीमानूर आदींसह जिल्हाभरातील 70  ग्रामपंचायतींच्या निवडणुका 26 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहेत. त्यामुळे या गावांतील राजकीय वातावरण ऐन पावसाळयात तापणार आहे. 

जिल्हाभरातील 117 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत संपणार आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम तयार झाला आहे. यापैकी 70 ग्रामपंचायतींच्या सदस्य तसेच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम काल (दि.23) आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या गावांत आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर होईपर्यत या गावांत मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती वा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्‍यांना करता येणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे राबविली जाणार आहे. 

अंतिम मतदारयादी आज 

निवडणूक जाहीर केलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 10 जुलै 2018 या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची यादी वापरली जाणार आहे. प्रारुप मतदार यादी 14 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली गेली असून त्यावर 20 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या गेल्या होत्या. हरकती निकाली काढून आज (दि.24) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची नावे

अकोले - लाडगाव, देवगाव, मुतखेल, वालुंजशेत, रेडे, कोहणे, रतनवाडी, पिंपळदरवाडी, जहागीरदारवाडी, पेढेवाडी, पाचपटटावाडी, तिरढे, कुमशेत, पेंडशेत, सुगाव बु., पाचनई, अंबित, शिसवद, बारी, साम्रद, कोकणवाडी  शेवगाव - एरंडगाव भागवत, लाखेफळ, पारनेर-जामगाव, वडणेर हवेली, राहुरी- मालुंजे खुर्द, माहेगाव, मुसळवाडी, टाकळीमिया, खुडसरगाव, चिखलठाण,श्रीगोंदा- घारगाव, घुटेवाडी, कोपरगाव-गोधेगाव, धामोरी, शिरसगाव, नगर-बुरुडगाव, जामखेड -जवळा, फक्राबाद, हाळगाव, धनेगाव, नेवासा - बेलपांढरी, गीडेगाव, गोमलवाडी, घोडेगाव, जैनपूर, जायगुडे आखाडा, खामगाव, खेडले काजळी, लोहारवाडी, नांदूरशिकारी, पानसवाडी, पाथरवाला, राजेगाव, सौदाळा, वडुले, वंजारवाडी, झापवाडी, श्रीरामपूर-भामाठाण, पाथर्डी-साकेगाव,दगडवाडी, डांगेवाडी, अंबिकानगर, रेणुकाईवाडी, टाकळीमानूर, करंजी, हात्राळ, शंकरवाडी, सैदापूर, संगमनेर-सारोळे पठार.