Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › नगर : कैद्यांनी शेतीतून घेतले 60 लाखांचे उत्पादन

विसापूर कारागृहात 'दो आँखें...'चा यशस्वी प्रयोग

Published On: Jan 14 2018 11:35AM | Last Updated: Jan 14 2018 11:56AM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

विसापूर जिल्हा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्यांनी शेतीतील भाजीपाला व विविध  धान्यांच्या उत्पदनातून वर्षभरात सुमारे 60 लाख रुपयांची उत्पादने घेतली आहेत. तसेच जनावरांचा गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळखत प्रकल्प, तुती उद्योग सुरू केला आहे. विसापूर खुल्या कारागृहातील 70 एकर शेतीतून राज्यभरातील  कारागृहांतील कैद्यांसाठी भाजीपाल्याचा पुरवठा केला जात आहे. जन्मठेपेचे कैदी शिक्षेची 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर समितीकडून शिफारशीनंतर काहींनी खुल्या कारागृहात पाठविले जाते.

असे अनेक कैदी विसापूरमध्ये आहेत. कृषी विज्ञान शाखेचे पदवी असलेल्या दत्तात्रय गावडे यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबविले  जाऊ लागले आहेत. सन 2017 या वर्षात तब्बल 60 लाखांपेक्षा अधिक कृषी मालाचे उत्पादन घेतले आहे. इतर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. कारागृह प्रशासनाने  बंदिवानाच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून ब्रिटिशकालिन अ‍ॅल्युमिनीयमची भांडी हद्दपार  केली आहेत.

आधुनिक तंत्रांचा वापर करून बनविलेली प्लास्टिकची भांडी व उबदार  कपड्यांचे वाटप नुकतेच कारागृह प्रशासनाने बंदिवानांना केले आहे. त्यात ब्लँकेट, थाळी, वाटी, कप याचा समावेश आहे. तसेच आरोग्य  बंदिवानांच्या जीवनाला दिशा  देण्याचा प्रयत्न गुन्हा केल्यानंतर शिक्षा भोगत असताना बंदिवानाच्या डोक्यात गुन्हेगारीचे  विचार राहू नये. त्यांच्या आचार, विचारात बदल होऊन बंदिवान शिक्षा भोगून बाहेर  पडल्यानंतर आदर्श व्यक्ती म्हणून नावारुपाला यावा, यासाठी कारागृह प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून त्यांच्यातील रोजगार व स्वयंरोजगार वाढीस लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. -दत्तात्रय गावडे (कारागृह अधीक्षक, विसापूर खुले कारागृह)

कैद्यांचा खासगी व्यवसाय लवकरच

पिंपळगाव-विसापूर रस्त्यावर कारागृह प्रशासनाच्यावतीने वॉशिंग सेंटर उभे केले जात आहे. कैद्यांकडून चालविणारा हा महत्त्वाचा खासगी व्यवसाय ठरणार आहे. तेथील  व्यवस्थापक, कामगार अशी भूमिका बंदिवानच बजाविणार आहेत. कैद्यांकडून चालविणारा जाणारा हा खासगी व्यवसाय परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.