Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Ahamadnagar › नगर : उपमहापौरांचा माफीनामा आणि राजीनामाही

नगर : उपमहापौरांचा माफीनामा आणि राजीनामाही

Published On: Feb 16 2018 4:10PM | Last Updated: Feb 16 2018 4:25PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि शिवजयंती विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उपमहापौरपदाचा राजीनामाही घेण्यात आला आहे. प्रभागात सफाईकामगार न आल्याने त्याला जाब विचारताना छिंदम यांनी छत्रपती शिवराय आणि शिवजयंती विषयी अवमानकारक शब्द वापरले होते. त्यामुळे अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. 

संबंधित बातम्या

नगर : शिवजयंतीबद्दल उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

शहरात शिवजयंतीची तयारी सुरू असल्याने तसेच सफाई कामगारांची संख्या कमी असल्यामुळे छिंदम यांच्या प्रभागात कामगार उपलब्ध झाले नसल्याचे सफाई कामगारांचे म्हणणे होते. ते समजावून सांगताना, छिंदम यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याशी वाद घातला. त्यातच त्यांनी शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यामुळे शहरात छिंदम यांच्या विषयी तीव्र संताप निर्माण झाला. 

संतप्त शिवप्रेमींनी नगरमधील छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी केली. शिवसेनेने पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरात वाढता तणाव आणि नागरिकांचा रोष लक्षात घेऊन छिंदम यांनी व्हिडिओ द्वारे शिवप्रेमी जनतेची माफी मागितली. मात्र, पक्षाने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला असून, पदाचा राजीनामाही घेतला आहे. शहरात नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू नये, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले आहे.