Sat, Nov 17, 2018 13:11होमपेज › Ahamadnagar › नगर : मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

नगर : मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

Published On: Apr 20 2018 12:06PM | Last Updated: Apr 20 2018 12:32PMअहमदनगर : प्रतिनिधी

वाळू ठेका चालविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजानन राशीनकर व बापू बाचकर अशी त्यांची नावे असून कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यबाबात गुरुवारी रात्री उशिरा ठेकेदार नंदरुमार गागरे (रा. देसवंडी. ता. राहुरी) यांनी  पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. १८ एप्रिल रोजी ही खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

Tags : Demand, Extortion, RS 10 Lakh,  Contractor, Sand, contract