Fri, Jul 19, 2019 19:53होमपेज › Ahamadnagar › खा. गांधींची फसवणूक, फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा 

खा. गांधींची फसवणूक, फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा 

Published On: Mar 04 2018 7:38PM | Last Updated: Mar 04 2018 7:38PMनगर : प्रतिनिधी

फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्राइवेट लिमिटेडचे मालक व कर्मचाऱ्यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा, नगरच्या शोरूमचे मालक भूषण बिहाणी, गोवर्धन बिहाणी, अभिषेक बिहाणी, कर्मचारी  सुशील ओसवाल, अजय रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.