Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Ahamadnagar › जेव्हा गाय-बैल रॅम्पवॉक करतात !

जेव्हा गाय-बैल रॅम्पवॉक करतात !

Published On: Dec 14 2017 1:28PM | Last Updated: Dec 14 2017 1:28PM

बुकमार्क करा

अहमदनगर : वृत्तसंस्था

गायी-बैलही रॅम्पवर रुबाबात  चालतात, असे म्हटले तर खरे वाटणार नाही ना? पण हे खरे  आहे, जिल्ह्यातील राजूर गावात 5 दशकांपासून आदिवासी बांधवाचे जिवलग  असलेल्या डांगी जनावरांची सौंदर्य स्पर्धा भरते. यामध्ये काही  जनावरे रॅम्पवॉक करतात, विशेष म्हणजे यात सरस असणार्‍या जनावरांना हजारो रुपयांचे बक्षीसदिले जाते. 

यंदाच्या या राज्यस्तरीय  देशी आणि डांगी जनावरांच्या प्रदर्शनामध्ये कोकणेवाडीच्या चंद्रकांत बेंडकुळे यांच्या वळूला सलग तिसर्‍या वर्षी चॅम्पियनचा मान मिळाला.  त्याला रोख 15 हजार  रुपये आणि चषक देण्यात आले. तर मेहेंदुरीच्या भाऊसाहेब वावळे यांच्या वळूने दुसरा क्रमांक पटकावला. त्याला 7 हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. आपल्या भागातील डांगी जनावरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पशुपालन व्यवसाय केल्यास चांगला फायदा होईल.

दूध आणि तूप यापासूनही  शेतकरी पैसा  कमवू शकेल. राजूर प्रदर्शनाला 50 ते 60 वर्षांची परंपरा लाभली आहे. राजूर ग्रामपंचायतीने ही परंपरा कायम राखली आहे. या प्रदर्शनात डांगी जनावरांची खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होऊन शेतकर्‍यांना फायदा होतो. हाच या प्रदर्शनामागील खरा उद्देश असल्याचे सांगितले जाते.