Fri, Mar 22, 2019 00:10
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › लोकन्यायालयात २ हजार प्रकरणे निकाली

लोकन्यायालयात २ हजार प्रकरणे निकाली

Published On: Dec 10 2017 1:17AM | Last Updated: Dec 09 2017 11:33PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

लोकन्यायालयात 1 हजार 941 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्याद्वारे 8 कोटी 9 लाख 44 हजार 389 रुपयांची वसुली झाली. जिल्हा न्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यासाठी 28 पॅनलची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये 1 हजार 169 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 6 कोटी 3 लाख 51 हजार 589 रुपये वसूल झाले. तालुका न्यायालयात 772 प्रकरणात तडजोड होऊन 2 कोटी 5 लाख 92 हजार 800 रुपये वसूल जमा झाले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी न्या. माळी बोलत होते. प्राधिकरणचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, न्या. पी. आर. बावके, न्या. माने, न्या. देशपांडे, न्या. गुप्ता आदींसह न्यायिक अधिकारी उपस्थित होते.

लोकन्यायालयात जिल्ह्यात 23 हजार 308 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये नगर येथील न्यायालयात 2 हजार 465 दाखल प्रकरणे तर खटलापूर्व प्रकरणे 7 हजार 636 अशी एकूण 10 हजार 111 प्रकरणे ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुका विधी समिती येथे एकूण दाखल प्रकरणे 2 हजार274 तर खटलापूर्व प्रकरणे 10 हजार 923 अशी एकूण 13 हजार 197 प्रकरणे ठेवण्यात आली.

राष्ट्रीय लोकन्यालयाच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांत समन्वयातून तडजोडीचा मार्ग स्वीकारला जातो. आपआपसांतील मतभेद विसरून नवीन पर्वास प्रारंभ होतो. लोकन्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त खटले निकाली काढण्यावेत, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी केले.