होमपेज › Ahamadnagar › हमालाची मुलगी बनली पोलिस उपनिरीक्षक

हमालाची मुलगी बनली पोलिस उपनिरीक्षक

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:33PMकर्जत : प्रतिनिधी

हमाली करत मुलांना शिकविणार्‍या पित्याची मुलगी पोलिस उपनिरीक्षक झाल्याने पाठीवरील ओझे खाली उताल्याचा आनंद पित्याला झाला आहे. तालुक्यातील डोणगाव या छोट्याशा गावातील शितल नवनाथ गायकवाड एमपीएससी परीक्षेत चौथी आली आहे. 

यशाबद्दल शितलचा संत कैकाडी महाराज विद्यालय, सोनेगाव येथे सत्कार झाला. संस्थेचे विश्वस्त श्रीदत्त बेरंगळ, रासाहेब वायकर, मुख्याध्यापक विक्रम राजेभोसले, प्रदीप भोसले, राम ढाळे, बाळासाहेब महामुनी, वाघमारे उपस्थित होते.

शितलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले. तिचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेभोसले यांनी केले. ते म्हणाले, शितलचे वडील पोट भरण्यासाठी गुजरातला गेले. शितलला त्यांनी सासुरवाडीला ठेवले. शितल डीएड् झाली. नोकरी मिळत नसल्याने निराश झाली नाही. लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली. हे यश कौतुकास्पद आहे. 
शितलने सांगितले, यशासाठी प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी आई-वडिलांचे कष्ट समोर ठेवून यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. बंडू चारणे यांनी सूत्रसंचालन केले.