Sun, Jun 16, 2019 12:30
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जतमध्ये बंद

हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जतमध्ये बंद

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 10 2018 11:12PMकर्जत : वार्ताहर 

नगर शहरातील केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व त्यांचे सहकारी वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद कर्जत शहरासह तालुक्यात उमटले. काल (दि.10) या घटनेच्या निषेधार्थ कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

नगरमधील केडगाव येथील शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. त्याचे पडसाद तालुक्यात उमटले होते. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध केला होत. सोमवारी (दि. 9) राशीन बंद ठेवण्यात आले होते. तसेच रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. निषेध सभाही घेण्यात आली.

काल शिवसेनेच्या वतीने कर्जत शहर बंदची हाक दिली होती. सकाळी शिवसेनेचे नेते बळीराम यादव, तालुका प्रमुख दीपक शहाणे, महावीर बोरा, अरविंद पाटील, अनिल यादव, पप्पू फाळके, महादेव जठार, खाजू बागवान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक बसस्थानकासामोर जमले होते. त्यानंतर शहरामधून सर्वांनी फेरी काढली. सकाळी पासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.  निषेध सभेत शहाणे यांनी या भ्याड हल्ल्याचा यावेळी निषेध केला. तसेच गुन्हेगारांना अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी केली.  यावेळी यादव, शहर प्रमुख गणेश क्षीरसागर, बोरा, पप्पू फाळके, रामेश्‍वर तोरडमल, राजेंद्र येवले, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.