Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Ahamadnagar › पोटनिवडणुकीत काँग्रेसचीच बाजी! 

पोटनिवडणुकीत काँग्रेसचीच बाजी! 

Published On: Apr 07 2018 10:57AM | Last Updated: Apr 07 2018 11:01AMनगर : प्रतिनिधी

काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या केडगाव पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या विशाल कोतकर यांनी शिवसेनेच्या विजय पठारे यांचा ४५४ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे विजयी उमेदवार कोतकर यांना एकूण २३४० मते पडली.    

पोटनिवडणुकीसाठी काल (दि.६) उत्स्फुर्त मतदान झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी दोनही मतदान केंद्रांवर तळ ठोकला होता. मात्र, जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ठोकणार्‍या भाजपला मतदान केंद्रावर साधे बुथही उभारता न आल्याची चर्चा रंगली होती.

सहा ते आठ महिन्यांवर असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने विशाल कोतकर यांना उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेनेने विजय पठारे यांना उमेदवारी देऊन सर्व शक्‍ती पणाला लावली होती मात्र, या चुरशीच्या लढतीत काँग्रेसनेच अखेर बाजी मारली. 

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - 

केडगाव पोटनिवडणूक मतमोजणी

प्रभाग ३२ ब निकाल
शिवसेना : विजय पठारे - १८८६ 
कॉंग्रेस : विशाल कोतकर - २३४० 
भाजप : महेश सोले - १५६ 
नोटा : ५०