Thu, Apr 25, 2019 11:51होमपेज › Ahamadnagar › बसची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

बसची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:36PMसंगमनेर : प्रतिनिधी
पुणे - नाशिक रस्त्यावरून संगमनेरकडे भरघाव जाणार्‍या एस. टी. बसने दिलेल्या धडकेत मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रवरा नदीच्या पुलाजवळ घडली. दगडू कोंडाजी पानसरे (वय 49 रा. घुलेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.शहरातील प्रवरा नदीच्या पुलावरून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दगडू पानसरे व अन्य एक असे दोघे मोटारसायकलवरून संगमनेरकडे चालले होते. 

दरम्यान, त्यांच्या मोटारसायकलला भरधाव  बसने जोराची धडक दिली. त्यात दगडू पानसरे यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले. तर दुसरा इसम जखमी झाले. मात्र जखमीचे नाव समजू शकले नाही. यावेळी अपघातग्रस्त बसचालक बससह पळून जाण्यात यशस्वी झाला. अपघात घडल्यानंतर प्रवरा नदीवर बघ्याची एकच गर्दी झाल्यामुळे पुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मयत पानसरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने घुलेवाडीवर  शोककळा पसरली आहे.

Tags : bus, two wheeler, accident, Biker, killed,