होमपेज › Ahamadnagar › बसची दुचाकीला धडक, एक ठार

बसची दुचाकीला धडक, एक ठार

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:56PMनेवासा : प्रतिनिधी

लक्झरी बस व एसटी बसच्या मध्ये दुचाकी सापडली. त्यात बसची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. जखमीला नगर येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील एस कॉर्नरवर शनिवारी सायंकाळी झाला. 

लक्झरी बस (क्र. एमएच-04 जीपी-543) ही शिर्डीकडून नेवाशाकडे जात होती. या बसच्या पाठीमागे दुचाकी (क्र. एमएच- 17 झेड- 6251) होती. या दुचाकीच्या पाठीमागून शिर्डी-औरंगाबाद ही बस (क्र. एमएच- 14 बीटी- 1050) येत होती. 

ही वाहने एस कॉर्नरजवळ आल्यानंतर दुचाकीच्या मागील बस दुचाकीवर आदळली. त्यात दुचाकीवरील संजय पांडुरंग शेळके (वय 35, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी कल्पना संजय शेळके (वय 30) या जबर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरातील युवकांनी जखमीला मदत केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.